Big News : पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. अन्न पाण्याविना जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. मात्र, मागणी मान्य झाल्याशिवाय पाणी पिणार नाही, तसेच उपचार देखील घेणार नाही, या मुद्द्यावर जरांगे-पाटील ठाम आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमधून आलेल्या एका महिला आंदोलकांनी जरांगे यांची प्रकृती पाहून हंबरडा फोडला. मी माझ्या भावाला अशा अवस्थेत बघू शकत नाही. तुम्ही प्लिज माझ्या भावाचा जीव वाचवा, अन्यथा मी विष पिऊन मरेन. जरांगेंचा जीव गेल्यावर त्यांना आरक्षण घ्यायचे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
जरांगेंचा जीव गेल्यावर आपण आरक्षण घ्यायचे का?; महिला आंदोलकांचा सवाल
आपल्या आजारी असलेल्या मुलासह या महिला आंदोलक अंतरवाली सराटी येथे आल्या होत्या. त्या म्हणाल्या की, मनोज जरांगे पाटील समस्त मराठा समाजाच्या कल्याणासाठी उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यांच्या पोटात अन्न-पाणी नाही. एक एक पेशी तुटून ते मरणासन्न अवस्थेला आले आहेत. त्यांच्या या परिस्थितीत आपण बघ्याची भूमिका घेणे म्हणजे मुर्खपणा आहे. (Big News ) जरांगेंचा जीव गेल्यावर आपण आरक्षण घ्यायचे का? जरांगे आपल्यासमोर तडफडून मरत असतील, तर आपण सर्व बांधवांनी आणि शासनाने ते कसे तडफडून मरतात हे बघायचं का? सरकारला त्यांचा जीवच घ्यायचा आहे हे आता स्पष्ट झाले आहे, असा आरोप महिला आंदोलकाने केला.
आंदोलक पुढे म्हणाल्या की, आरक्षणावर विचार करण्यासाठी सरकारला तब्बल ४० दिवस दिले. या ४० दिवसांत सरकारने काहीच प्रयत्न केल्याचे ऐकले नाही. फक्त पुराव्यांच्या आधारे संसदेत आणि विधीमंडळात विधेयक पारित करायचे होते. त्यांनी ते केलं नाही. (Big News ) म्हणजे त्यांना माझ्या भावाचा जीव धोक्यात टाकायचाच आहे, हे स्पष्ट होते. मी माझ्या भावाला अशा अवस्थेत बघू शकत नाही. तुम्ही माझ्या भावाचा जीव वाचवा, अन्यथा मी विष पिऊन मरेन. त्यांच्या अंगात अजिबात त्राण उरलेला नाही. त्यांना दवाखान्यात घेऊन जा.
माझ्या भावाच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. (Big News ) त्या गुठळ्या मेंदूत किंवा हृदयात अडकून माझ्या भावाचं काहीही होऊ शकतं. ते उपचार घेत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही. भावावर उपचार केल्याशिवाय मी जाणार नाही, असा इशारा आरोग्यसेवाका असलेल्या या आंदोलकांनी दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मराठा आरक्षणाचा विषय आला की दादा आजारी पडतात; जरांगे पाटलांच्या मुलीची टीका
Big News : ITR भरणाऱ्यांच्या संख्येत 90 टक्क्यांची वाढ; 2021-22 मध्ये संख्या 6.37 कोटींवर