Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: कायद्यात टिकणारं मराठा आरक्षण देऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 30 October 2023, 13:11
CM eknath shinde start campaign for loksabha from january 6

मुंबई: मराठा आरक्षणाला हे मुंबई हायकोर्टात आव्हान दिले, परंतु ते टिकवले गेले. मात्र सुप्रीम कोर्टात ते आरक्षण दुर्दैवाने टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत काही त्रुटी आणि निरिक्षणे नोंदवली. त्यावर स्पष्टीकरण तत्कालीन सरकारने दिले नाही. मी राजकारण करणार नाही. परंतु काही कागदपत्रे सादर करण्यासाठी अनेकदा वेळ मागितली गेली. मराठीतून इंग्रजीत भाषांतर करून देताना काही त्रुटी राहिल्या. या त्रुटी दूर करण्याचे काम, मराठा समाज मागास कसा आहे, हे सिद्ध करण्याचे काम आमचे सरकार करेल. तसेच कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि राज्यभरात सुरू असलेली आंदोलन या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज पार पडली. मी स्वत: या बैठकीत सहभागी झालो. न्या. शिंदे समिती काही दिवसांपूर्वी नेमली होती. त्या समितीने पहिला अहवाल आमच्यासमोर सादर केला आहे. हा अहवाल उद्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये मांडून पुढील प्रक्रिया करणार आहे. या समितीने 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी केली. त्यांना 11530 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. समितीने संपूर्ण सविस्तर अहवाल सादर केला आहे. फार जुने रेकॉर्ड देखील या समितीने तपासले, त्यात ऊर्दू, मोडी लिपीतही रेकॉर्ड होते. आणखी काही जुन्या नोंदी सापडण्याची शक्यता असल्याने समितीने आणखी 2 महिन्याची मुदत मागितली. न्या. शिंदे समितीने अनेक पुरावे तपासले आहेत, त्यामुळे सरकारने त्यांना 2 महिन्याची मुदत दिली.

त्याचबरोबर मूळ मराठा आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले, त्यावर राज्य सरकार काम करतंय. क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण लिस्टिंग करून खटला ऐकू असं म्हटलं आहे. त्याबाबत देखील सरकारचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. मागासवर्गीय आयोगही यावर काम करत आहे.

ज्या तज्ज्ञ संस्था आहेत त्या या आयोगाला मदत करतील. इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम होईल. मराठा समाज मागास कसा आहे? हे सिद्ध क्युरिटिव्ह पिटिशेनमधून सिद्ध करता येईल.सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी काढल्या. त्या दूर करण्यासाठी न्या. गायकवाड, न्या. भोसले, न्या शिंदे यांची सल्लागार बोर्ड म्हणून नियुक्ती केली आहे. 3 निवृत्त न्यायमूर्तीची समिती ही सरकारला क्युरेटिव्ह पिटिशन आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारला मदत करेल असं त्यांनी सांगितले.

तसेच उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आणि मराठा उपसमितीची उद्या चर्चा होईल. मनोज जरांगे पाटील आणखी थोडा वेळ सरकारला द्यायला पाहिजे. त्यांच्या तब्येतीची आम्हा सर्वांना चिंता आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे. गेल्यावेळी आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले. या मोर्चांना कुठेही गालबोट लागले नाही. लाखोंचे मोर्चे काढूनही राज्यातील शांतता, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली नव्हती. परंतु, दुर्दैवाने आज काही लोक जाळपोळ, कायदा सुव्यवस्था हाती घेतलीय. मराठा समाजाने टोकाचे पाऊल उचलू नका. आपल्या मुलाबाळांचा, आई वडिलांचा विचार करा असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post
SC orders Maharashtra speaker to decide on disqualification pleas against Shinde, his MLAs by Dec 31

राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, दुसरं वेळापत्रकही फेटाळलं, आता 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.