Big News : मुंबई : आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा महाधिवक्ता तुषार मेहता यांच्यासोबत सल्लामसलत करण्यासाठी नवी दिल्ली येथे रवाना झाले आहेत.
काय निर्णय लागणार, याबाबतची उत्सुकता वाढली
अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया सुरू केली आहे. नार्वेकर हे आठ दिवसांत दुसऱ्यांदा मेहता यांच्या भेटीला जात आहेत. यामुळे काय निर्णय लागणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त करत त्यांना सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते.(Big News) ३० ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर न केल्यास आम्ही दिलेले वेळापत्रक स्वीकारावे लागेल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे सुनावणीच्या नव्या वेळापत्रकाबाबत चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, नार्वेकर म्हणाले की, आमदार अपात्रतेबाबत दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणारआहे. हा माझा पूर्वनियोजित दौरा आहे. (Big News) राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना नोटीस ही अपात्रतेबाबतची प्रक्रिया आहे. याबाबत छाननी झालेली आहे. त्यानुसार नोटीस दिलेल्या आहेत. वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे, तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन.
दरम्यान, ठाकरे गटाकडून आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांना दोनदा पत्र देऊन सुद्धा प्रत्यक्षात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. (Big News) विधान परिषदेतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी हिवाळी अधिवेशन पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ; आधारकार्डशिवाय ‘नो एन्ट्री’,
Big News : मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी ; २० कोटी रुपयांची मागणी
Big News : ओळख लपवून लग्न करणे; अथवा संबंध ठेवणे; गुन्हा…! होणार 10 वर्षांपर्यंतची शिक्षा..