व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Big News : ओळख लपवून लग्न करणे; अथवा संबंध ठेवणे; गुन्हा…! होणार 10 वर्षांपर्यंतची शिक्षा..

10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद 

Big News : कायदेविषयक संसदीय समितीने या संदर्भात एक अहवाल तयार केला असून या संदर्भात विधेयकही आणले जाऊ शकते. यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने लग्न करण्यासाठी आपली ओळख लपवली अथवा संबंध प्रस्थापित करण्यासाठी असे केले, तर तो बलात्कार मानला जाणार नाही, मात्र छळ मानला जाईल.

10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद 

अशा प्रकरणांत 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्याची तयारी सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, रोजगार देणे, प्रमोशन अथवा लग्नाचे आश्वासन देऊन ओळख लपवून लग्न करणे छळ मानला जाईल, असे या सेक्शनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय न्यायिक संहिता विधेयकावर स्थायी समितीचा मसुदा अहवाल शुक्रवारी सादर केला जाईल.

विवाहित असल्याची माहिती लपवून अथवा आपली खरी ओळख लपवून एखाद्या महिलेसोबत लग्न करणे अथवा तिच्या सोबत संबंध प्रस्थापित करणे भारतीय न्यायिक संहितेनुसार गुन्हा ठरणार आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 69 नुसार असे करणे छळ मानले जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकेल.

कायदेविषयक संसदीय समितीने या संदर्भात एक अहवाल तयार केला असून या संदर्भात विधेयकही आणले जाऊ शकते.

आपली ओळख लपवून, धर्म लपवून अथवा लग्न लपवून एखाद्या महिलेसोबत लग्न केल्याचे आणि नंतर तिचा छळ केल्याचे, अनेक प्रकार गेल्या काही वर्षांत समोर आले आहेत. मात्र आता, ओळख लपवून लग्न करणे, गुन्हा मानून स्वतंत्रपणे खटला चालविला जाईल, असे पहिल्यांदाच होणार आहे.

Next Post

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!