पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच आता बहिणीची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबविली आहे.या पडताळणीत योजनेतील काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत आहेत. अशा अपात्र ठरणाऱ्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही.
राज्य सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटींहून अधिक बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. आतापर्यंत महिलांना जुलै ते एप्रिल अशा महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता मे महिन्याच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या असताना या योजनेतून अपात्र ठरलेल्या महिलांना मे महिन्याचा हप्ता येणार नसल्याच समोर आलं आहे. या योजनेसाठी पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्माननिधी परत घेण्यात येणार नसून, अपात्र ठरलेल्या महिलांना या योजेतून वगळण्यात येणार आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेबाबत बोलताना 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे असे स्पष्ट केले आहे.