Beed News : बीड : बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका अॅम्बुलन्सला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डॉक्टरसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा अपघात मुंबईहून बीडकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला झाला आहे. ट्रव्हल्स उलटून झालेल्या या अपघतात एकूण ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. असे या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
अनेक गंभीर जखमी
अॅम्बुलन्स चालक भरत सिताराम लोखंडे (35 वर्ष), मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के (वय 35 वर्ष) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.(Beed News) तर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीत दोलावडगाव येथे एका भरधाव अॅम्बुलन्सने ट्रकला मागच्या बाजून जोरदार धडक दिली. (Beed News) ही धडक इतकी जोरदार होती की यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे मुंबईहून बीडकडे जाणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला अपघाता झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटून हा अपघात झाला आहे. (Beed News) आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील आष्टा फाटाजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Beed News : बीड हादरले! ठाकरेंच्या विश्वासू नेत्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला!
Beed News : पाहताक्षणी दोघांचं जडलं प्रेम, साता जन्माच्या आणाभाका, अन्…