Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed News : पोषण आहार शिजवणारी महिला आणि शिक्षिकेमध्ये फ्री स्टाइल हाणामारी ; नेमकी कोणाची खिचडी शिजतेय? व्हिडीओ व्हायरल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 July 2023, 15:43

Beed News  : बीड : शालेय पोषण आहार वाटपाची गुणवत्ता, शिजवण्यातील अडचणी यावरून अनेक कारणांनी गदारोळ झाल्याचे आपण वाचले असेलच. आता शिक्षिका आणि पोषण आहार शिजवण्याचे काम करणाऱ्या महिलेची फ्री स्टाइल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोड हिंगणी शाळेत ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामागे शाळेतील अंतर्गत राजकारण असल्याचे कारण ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र, खिचडी कोणाची शिजत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(Beed News)

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघींनी शाळेच्या प्रांगणात अक्षरशः एकमेकींचे केस ओढत मारहाण केली. या वेळी खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पतीसह शाळेत येऊन शिक्षिकेबरोबर झटापट केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना पुरेसे दर्जेदार अन्न देण्याची मागणी करणाऱ्या शिक्षिकेला पतीसह उपस्थित राहत पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने हुज्जत घातली. यामागे शाळेतील अंतर्गत राजकारण असल्याचे ग्रामस्थ म्हणत असल्याने नेमकी खिचडी कोणाची शिजत होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.(Beed News)

जोड हिंगणी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथी वर्गामध्ये जवळपास ६० विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खिचडी शिजवणाऱ्या महिलेकडून निकृष्ट दर्जाचा आहार देणे, अल्प प्रमाणात खिचडी, बिस्किट देण्याचे प्रकार सातत्याने होतात. यामुळे शाळेतील एका शिक्षिकेने या महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरून पोषण आहार देण्यास सांगितले. यावरून हा वाद पेटल्याची चर्चा आहे. या प्रकरणात अद्याप कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.(Beed News)

 

याबाबत शाळेतील एका शिक्षिकेने महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरून पुरेसा पोषण आहार देण्याची मागणी करत पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेला मागील पंधरा दिवसांपूर्वी विनंती केली होती. तेव्हापासून खिचडी शिजवणाऱ्या महिला शिक्षिकेबाबत उलटसुलट चर्चा करत चुकीचे वक्तव्य करत असे, असा आरोप आहे. यातच खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेच्या आवारात लघु शंका करत असल्याबाबतही महिलेने पतीला समज द्यावी असे सांगण्यात आले. परंतु सगळा गाव येथे येऊन तेच करतो मग माझ्या पतीने केल्यानंतर तुझं काय दुखतं… असं म्हणत शिक्षिकेवरच आकस दाखवला होता.(Beed News)

दरम्यान, या प्रकारास मुख्याध्यापकच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पुरेस अन्न विद्यार्थ्यांना देणे आणि यावर नियंत्रण ठेवणे हे मुख्याध्यापिकेचे काम असताना मुख्याध्यापिका सुद्धा खिचडीमध्ये हात ओले करून घेत असल्याची चर्चा गावातील नागरिकांमधून केली जात आहे.(Beed News)

हा वाद पूर्वनियोजित आहे का? असा संशय ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. या झालेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे धारुर तालुक्यात दिवसभर याचीच चर्चा सुरू आहे. शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले असून त्यात दोघांपासून जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे. मुख्याध्यापक यास कारणीभूत असल्याच्या चर्चेने नेमकी कोणाची खिचडी शिजत नव्हती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(Beed News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08
Next Post

Shirur News : घोडनदी बार असोसिएशनच्या सदस्यपदी ॲड. जयवंत शिलवंत यांची बिनविरोध निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp