मुंबई : अर्जेंटिनाच्या रूपाने फुटबॉल विश्वाला नवीन विश्वविजेता मिळाला. लियोनेल मेस्सीच्या दमदार खेळाच्या जोरावर अर्जेंटिना संघाने या विश्वकरंडक स्पर्धेत आपली छाप सोडली. जसा फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली त्याचप्रमाणे मैदानाबाहेर देखील एक लढत सुरु होती. ती म्हणजे आदिदास आणि नायका या दोन क्रीडा साहित्य उत्पादकांच्या शेयरच्या किमतीत.
आदिदास ही कंपनी अर्जेंटिना संघाला तर नायके ही कंपनी फ्रान्स या संघाला प्रायोजकत्व दिले होते. स्पर्धा जशी पुढे जात होती, त्याप्रमाणेच या दोन्ही कंपन्यांच्या शेयर्समध्ये देखील चढ-उतार होत होती. अर्जेंटिनाचा संघ आदिदासची जर्सी घालून मैदानात उतरल्यानंतर कंपनीच्या शेयरमध्ये सुमारे १.९३ टक्क्यांची वाढ होऊन तो १२१.३० युरोवर (फ्रँकफर्ट स्टॉक एक्सचेंज) क्लोज झाला. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र, फ्रान्सची प्रायोकत्व स्वीकारलेल्या नायकेच्या शेयरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.
यावर्षीच्या आकड्यांमध्ये आदिदासच्या शेयर्समध्ये विश्वकरंड स्पर्धेपूर्वी ५३.२६ टक्के घसरण झाली होती. मात्र, विश्वकरंडक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आदिदासच्या शेयर्समध्ये वाढ झाली. ३ नोव्हेंबर पासून आतापर्यंत आदिदासचा शेयरमध्ये तब्बल २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे अर्जेटिना संघाची जर्सी. अर्जेंटिना संघ जसा जसा स्पर्धेत पुढे सरकत होता, त्याप्रमाणेच मेस्सीचा फोटो असलेल्या जर्सीच्या विक्रीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. यामुळे कंपनीच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याने याचा परिणाम कंपनीच्या शेयर्सवर दिसून आला.