लंडन : भारतीय लेगस्पिनर युझवेंद्र चहल ‘कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू’चे उर्वरित पाच सामने आणि वनडे चषकाचे अंतिम सामने खेळण्यासाठी नॉर्थहॅम्प्टनशायरमध्ये दाखल झाला आहे. ३४ वर्षीय चहलने आतापर्यंत भारतासाठी ७२ एकदिवसीय आणि ८० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि दोन्ही फॉरमॅटमध्ये २१७ बळी घेतले आहेत.
नॉर्थम्प्टनशायरने त्यांच्या वेबसाइटवर सांगितले की, भारताच्या टी-२० विश्वचषक विजेत्या मोहिमेत भूमिका बजावणारा चहल केंटविरुद्धच्या सामन्यासाठी कँटबरीच्या प्रवासापूर्वी बुधवारी संघात सामील होईल. नॉर्थम्प्टनशायर काँटी क्रिकेट क्लबला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल केंटमधील अंतिम एकदिवसीय चषक सामन्यासाठी आणि उर्वरित पाच कौटी चॅम्पियनशिप सामन्यांसाठी क्लबमध्ये सामील होईल, असे नॉर्थम्प्टनशायरने एका निवेदनात म्हटले आहे.