पुणे प्राईम न्यूज: रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर केवळ 199 धावा करू शकला. भारतीय फिरकीपटू कांगारू फलंदाजांसाठी एक कोडेच ठरले. भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज रवींद्र जडेजा ठरला. जडेजाने 10 षटकात 2 मेडन्ससह केवळ 28 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. भारताची गोलंदाजी एवढी भेदक होती की, ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची मधली फळी पत्त्यासारखी कोसळली.
मिडल ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मिचेल मार्श खातेही न उघडता बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला विराट कोहलीद्वारा झेलबाद केले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. मात्र, चेंडू जुना झाल्यानंतर दोघांनाही धावा काढणे कठीण झाले.
हेही वाचा:
शेतकऱ्यांना पिक कर्ज वेळेत न दिल्याने भाजप नेत्यानी लगावली बँक कर्मचाऱ्याच्या कानशिलात
अखेर इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाशी झाला संपर्क, अडचणीनंतर अभिनेत्री सुरक्षितपणे परतणार भारतात