मुंबई : सिराजने आपल्या पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले. तिसऱ्या चेंडूवर त्याने जॉनी बेअरस्टोला बाद केले आणि शेवटच्या चेंडूवर त्याने जो रूटला स्लिपमध्ये झेलबाद केले. इंग्लंडचे दोन्ही खेळाडू खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले.
दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर जेसन रॉय आणि बेन स्टोक्स डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या पाच षटकांमध्ये इंग्लंडच्या दोन बाद ३२ धावा झाल्या आहेत.
भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका निर्णायक टप्प्यात आली आहे. या मालिकेतील तीसरा आणि शेवटा सामना आज (१७ जुलै) मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकलेला असल्याने मालिका बरोबरीमध्ये आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिकादेखील जिंकले त्यामुळे दोन्ही संघ आज विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतील.