बंगळुरू : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सिरीजचा पहिला सामना आज बंगळुरूमध्ये होणार होता. परंतु, पावसाच्या आगमनाने आजचा दिवस पावसानेच खेळून काढला आहे. टीम इंडियाने नुकतंच कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बांगलादेशला कसोटी मालिकेत क्लीन स्वीप दिला होता. आता न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न टीम इंडिया सज्ज झाली आहे. मात्र, आता पहिल्याच दिवशी रोहित शर्माच्या हेतूवर पाणी फेरलं गेलं आहे. त्याला कारण बंगळुरूमधील पाऊस. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सिरीजच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोर धरला आणि खेळ खंडोबा केला. त्यामुळे टीम इंडियाला ड्रेसिंग रुम सोडून हॉटेलवर परतावं लागलं आहे.
रोहित शर्माच्या टेन्शनमध्ये वाढ..
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप लक्षात घेऊन टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. भारताला आणखी 8 कसोटी सामने खेळायच्या असून त्यातील 5 सामने टीम इंडियाला काहीही करून जिंकायचे आहेत. अशातच आता पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेला आणि एकही चेंडू टाकता आला नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.