वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी – २० मालिकेला उद्यापासून (शुक्रवार) वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. टी २० नंतर एकदिवसीय मालिका देखील खेळवली जाईल. बीसीसीआयने न्यूझीलंड दौऱ्यासाठी टी-२० विश्वचषक २०२२ संघातील बहुतांश खेळाडूंना विश्रांती दिली आहे.
रनमशीन विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक, कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल या मालिकेला दिसणार नाहीत. हार्दिक पांड्या तीन सामन्यांच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. यानंतर वनडेची जबाबदारी शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे.
या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेला भारतीय संघ :
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया – हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
आगामी एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेला भारतीय सांघ
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया – शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक
भारत-न्यूझीलंड T20 आणि ODI मालिकेचे वेळापत्रक
पहिली टी-२०: १८ नोव्हेंबर २०२२, दुपारी १२ वाजता
दुसरी टी-२० : २० नोव्हेंबर २०२२, दुपारी १२ वाजता
तिसरी टी-२० : २२ नोव्हेंबर २०२२, दुपारी १२ वाजता
पहिला एकदिवसीय सामना : २५ नोव्हेंबर २०२२, सकाळी ७
दुसरा एकदिवसीय सामना : २७ नोव्हेंबर २०२२, सकाळी ७
तिसरा एकदिवसीय : ३० नोव्हेंबर २०२२, सकाळी ७ वाजता