Sports News : पुणे : आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाचा सामना तब्बल २७ वर्षांनी पुणे शहरात होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर १९९६ मध्ये विश्वचषकाचा सामना झाला होता. वेस्ट इंडिज विरुद्ध केनिया या दोन संघांदरम्यान हा सामना रंगला होता. त्यानंतर २०११ मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा झाली. परंतु पुणे स्टेडियमवर एकही सामना झाला नाही. आता २०२३ मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर पाच सामने होणार आहेत. पुणे शहरात दीर्घ कालावधीनंतर वर्ल्डकपचा सामना होणार असल्याने ‘एमसीए’कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आकर्षण भारतीय क्रिकेट संघाचा १९ ऑक्टोबरचा बांगलादेश विरुद्धचा सामना असेल.
‘एमसीए’कडून जय्यत तयारी
जागतिक क्रिकेट करंडक स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने वर्ल्ड कप स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघाची जोरदार तयारी झाली आहे. रोहित अँड कंपनी आपले कौशल्य या स्पर्धेत दाखवणार आहे. (Sports News) पुणे येथे होणाऱ्या सामन्यांसाठी एमसीएकडून जय्यत तयारी केली गेली आहे. या सामन्यांसाठी पुणे शहरात देशभरातून क्रिकेट प्रेमी येणार आहेत. यामुळे अनेकांनी आपले हॉटेल आणि तिकीटे बुक केली आहेत.
दरम्यान, या सामन्याच्या दिवशी शहरातील हॉटेलचे दर वाढले आहेत. सर्व हॉटेल फुल्ल झाली आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सामन्यांची पूर्ण तयारी झाल्याचे सांगितले आहे.(Sports News) दिवसा असणाऱ्या या सामन्यांसाठी पाणी, शौचालय, पार्किंग ही सर्व व्यवस्था केली गेली आहे.
यंदा प्रथमच विश्वचषक स्पर्धेचे सर्वाधिक सामने महाराष्ट्रात होणार आहेत. राज्यात एकूण १० सामने होणार असून, त्यापैकी पाच सामने पुणे शहरात होणार आहेत. (Sports News) तर पाच सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. या वेळी बोलताना रोहित पवार यांनी, भारतीय संघाने विश्वचषक जिंकावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
असे पार पडतील सामने….
१९ ऑक्टोबर : भारत वि. बांगलादेश
३० ऑक्टोबर ः अफगाणिस्तान वि क्वालिफायर २
१ नोव्हेंबर : न्यूझीलँड वि दक्षिण आफ्रिका
८ नोव्हेंबर : इंग्लंड वि क्वालिफायर १
१२ नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : गोल्फर अदिती अशोकची रौप्य पदकाला गवसणी
Sports News : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सहा पदके; महिला क्रिकेटसह नेमबाजीत सुवर्णपदक
Sports News : भारतीय क्रिकेट संघाने रचला इतिहास !. तिन्ही फॉरमॅट मध्ये पटकाविले प्रथम स्थान