Sports News : कराची : पाकिस्तानचा संघ भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळायला येणार की नाही, याबाबतचा निर्णय पाकिस्तान सरकार घेणार आहे. आधी भारतातील मैदानावरील सुरक्षेचा आढावा घेणार असे म्हणणाऱ्या पाकिस्तान सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ पाठवायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती सर्व बाबींवर चर्चा करून आपला अहवाल शरीफ यांच्याकडे सोपवणार आहेत.
क्रिकेट संघ भारतात पाठवायचा की नाही या निर्णयासाठी उच्चस्तरीय समिती
पाकिस्तानचे पंतप्रधान हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संरक्षक देखील असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि बीसीसीआय यांनी यापूर्वीच वर्ल्डकपचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे.(Sports News ) त्यांना आशा आहे की, पाकिस्तान 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतात येईल. मात्र, पीसीबीने दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावपूर्ण संबंधामुळे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सरकारची परवानगी लागेल, असे सांगितले.
पाकिस्तानने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत क्रीडामंत्री अहसान मजारी, मरियम औरंगजेब, असद महमूद, अमीन उल हक, कमर जमानकैरा आणि तारिक फातमी यांचा समावेश आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे काळजीवाहू अध्यक्ष जका अशरफ आणि सीईओ सलमान तासीर हे डर्बन येथे होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. (Sports News ) या बैठकीत सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा संघ भारतात पाठवण्यास नकार देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, पहा कोणाला मिळाली संधी…
Sports News : एशियन फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भवानी देवीने रचला इतिहास
Sports News : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; 31 ऑगस्टपासून होणार सुरुवात