Shirur News : शिरूर : मध्यप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सणसवाडी येथील जय हनुमान तालीम संघाची राष्ट्रीय खेळाडू पै. मनस्वी पांढरे हिने १४ वर्षांखालील मुलींच्या ३९ किलो वजन गटात संपूर्ण भारतात तृतीय क्रमांक पटकावत, ब्रांझ पदकाला गवसणी घातली.
मनस्वीचे सर्व स्तरांमधून अभिनंदन
मनस्वी पांढरे हिने सणसवाडी येथील जय हनुमान तालीम संघात कुस्तीचा सराव केला. या वेळी शिरूर केसरी पै. चंद्रकांत दरेकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले.(Shirur News) नरेश्वर कुस्ती केंद्राचे वस्ताद पै. भांडवलकर यांनी तिला डावपेच शिकवत, राष्ट्रीय स्पर्धेसाठी विशेष तयारी करून घेतली. उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जिद्द, चिकाटीने कष्ट केले तर हमखास यश मिळते, हे मनस्वीने दाखवून दिले आहे.
उदयोन्मुख खेळाडूंपुढे मनस्वीने एक आदर्श ठेवला आहे. या यशामागे मनस्वीच्या आई-वडिलांची मेहनत आहे. कोणताही खेळाडू हा आई-वडिलांच्या पाठींब्याशिवाय घडू शकत नाही. (Shirur News) त्यामुळे मनस्वी व तिच्या आई-वडिलांचे खूप अभिनंदन, असे गौरवोद् गार मार्गदर्शक शिरूर केसरी पै. चंद्रकांत दरेकर यांनी काढले.
यशाबद्दल मनस्वीचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल लवकरच तिचा जाहीर सत्कार ग्रामस्थ व जय हनुमान तालीम संघाच्या वतीने करण्यात येणार आहे. (Shirur News) जय हनुमान तालीम संघाचे पदाधिकारी पै. बाबाबसाहेब दरेकर, अॅड. विजयराज दरेकर, देवरामभाऊ दरेकर यांनी अशा जिद्दी व मेहनती खेळाडूंमुळे शिरूर तालुक्याचे कुस्तीचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे गौरवौद्गार काढले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : खोलीकरणाने जलस्त्रोत बळकट होणार – सुदाम इचके
Shirur News : कवठे ग्रामपंचायत मधील रिक्त पदाची पोटनिवडणूक जाहीर..