Ranji Trophy : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माचा फ्लॉप शो सर्वांनीच बघितला आहे. रोहितला एकाही डावामध्ये मोठा स्कोर करता आला नाही. हीच अहमहमिका रणजी ट्रॉफी दरम्यानही दिसून आली. रोहित शर्माला 19 बॉलमध्ये केवळ 3 धावा करता आल्या आहेत. 10 वर्षानंतर रोहित शर्मा रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी उतरला आहे. पण युवा गोलंदाजांसमोर खेळताना रोहित शर्मा चाचपडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हिटमॅनला झालंय तरी काय? असा प्रश्न आता विचाराला जाऊ लागला आहे.
मुंबई संघ अडचणीत
जम्मू काश्मीरचा गोलंदाज उमर नाजीर मीर याने रोहित शर्माला दोन ओव्हरमध्ये एकही धाव घेऊ दिली नाही. आयुष म्हात्रे आणि हिमांशू सिंग यांना बाकावर बसवून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांना संघात स्थान मिळालं होतं. मात्र, दोघंही अपयशी ठरल्याने मुंबईचा संघ अडचणीत आला आहे. यशस्वी जयस्वाल देखील फक्त 4 धावा करून बाद झाला, तसेच श्रेयस अय्यर 11 रन करून माघारी परतला आहे.
भारतीय फलंदाजांची घरच्या मैदानावर कसोटी
भारतीय फलंदाजांचा घरच्या मैदानावर कस लागताना दिसत असून ऋषभ पंत 1 धाव करून बाद झाला आहे. तर शुभमन गिलला देखील मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. तसेच मुंबईकर खेळाडूंना देखील लय सापडत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता खरी कसोटी खेळाडूंना इथंच द्यावी लागणार आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार),रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, शार्दुल ठाकुर, तनुष कोटीयन, शम्स मुलानी, मोहित अवस्थी आणि कर्ष कोठारी.
जम्मू-काश्मीर प्लेइंग ईलेव्हन : पारस डोगरा (कॅप्टन),विवरांत शर्मा, शुभम खजूरिया, अब्दुल समद, कन्हय्या वधावन (विकेटकीपर), यावर हसन, औकिब नबी डार, युद्धवीर सिंह चरक, आबिद मुश्ताक, उमर नझीर मीर आणि वंशज शर्मा.