मुंबई: स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुध्द होणार आहे. यामध्ये त्याला एक सुवर्णसंधी चालून आली आहे.
या सामन्यात जडेजा जर 41 धावा करण्यास यशस्वी झाला, तर तो आयपीएलमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठेल. तसेच तो आयपीएलमध्ये 160 बळी घेण्यात यशस्वी झाला आहे. आता जर त्याने 41 धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये 3000 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 150 पेक्षा जास्त बळी घेणारा पहिला खेळाडू बनेल.
त्याच्या आधी आयपीएलमध्ये आजपर्यंत कोणत्याही अष्टपैलू खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. जडेजा २००८ पासून आयपीएलमध्ये सहभागी होत आहे. पहिल्या हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.