मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी करत 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता एकतर 19 वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल किंवा 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीची पुनरावृत्ती होईल हे निश्चित आहे. 19 नोव्हेंबर 2023 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) यांच्यात एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये रोहित ब्रिगेडला पराभवाचा सामना करावा लागला होता, हे क्रिकेटप्रेमी विसरले नसावेत. पण आता हा सगळा इतिहास घडला आहे. ताजी बातमी म्हणजे भारत आणखी एक क्रिकेट विश्वचषक जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
बेनोनी येथे मंगळवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना रंगला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी कर्णधार उदय सहारनचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दक्षिण आफ्रिकेला 244/7 धावांपर्यंत रोखले. यानंतर सुरुवातीच्या गडबडीनंतर सामना 2 गडी राखून जिंकला. गेल्या सामन्यातील शतकवीर सचिन धसने भारतीय संघासाठी 96 धावांची सुंदर खेळी केली. कर्णधार उदय सहारनने 81 धावा केल्या
19 वर्षांखालील विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. पाकिस्तानने गट आणि सुपर सिक्स फेरीतील आपले सर्व सामने जिंकले. ऑस्ट्रेलियाने गट फेरीतील सर्व सामने जिंकले. सुपर सिक्समध्ये त्यांनी एक सामना जिंकला आणि एक सामना पावसामुळे गमावला. आता गुरुवारी ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान यापैकी कोणताही संघ पराभूत होईल, तो स्पर्धेतून बाहेर पडेल. विजेत्या संघाचा सामना 11 फेब्रुवारीला अंतिम फेरीत भारताशी होईल.