लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : पाचगणी येथील विद्यानिकेतन हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या आंतरशालेय तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत नॅशनल पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १४, १७ व १९ वयोगटातील मुला-मुलींनी घवघवीत यश संपादन केले.
विद्यानिकेतन हायस्कूलच्या मैदानावर संपन्न झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन वाई येथील किसनवीर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. समीर पवार, विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्यूनिअर काॅलेजच्या संचालक भारती बिरामणे यांच्या हस्ते झाले. (Pachgani News) या वेळी नॅशनल पब्लिक स्कूलचे संस्थाचालक मूसा नाटकल, दाऊद पेरुवाड, क्रिडा सहाय्यक अधिकारी सुनील कोळी, प्राचार्य आशुतोष पिसे, मुख्याध्यापिका संयोगिता नाईक-निंबाळकर, क्रिडा शिक्षक सागर गंभिरे, निलेश खुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुकास्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेला तालुक्यातील १४, १७ व १९ वर्षांच्या आतील खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी सुनील कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. (Pachgani News) स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत भिसे, शिवशंकर चोरट, प्रणित सुतार, सुरज ढेंबरे, अनिकेत गायकवाड, हेमंत लाडे, सुशांत साळुंखे, राजेंद्र जंगम, सचिन तिमुनकर, ओमकार भागवत, शिरिष ननावरे यांनी काम पाहिले.
Pachgani News : विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत पाच जिल्ह्यांतील १,२५० स्पर्धकांची दमदार कामगिरी
Pachgani News : आंब्रळच्या उपसरपंचपदी भानुदास बिरामने बिनविरोध
Pachgani News : क्रीडा स्पर्धांमुळे खिलाडू वृत्ती वृद्धिंगत होण्यास मदत- डॉ. समीर पवार