योगेश पडवळ
Pabal News : पाबळ : डीजीटल युगात भावी पिढी मैदानी खेळापासून दूर जाऊ लागली आहे. निरोगी आरोग्यासाठी मैदानी खेळाला महत्त्व दिले गेले पाहिजे. यासाठी शालेय स्तरावर क्रिडांगण उभे केले पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी व्यक्त केले.
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे भोसे येथे उद्घाटन
भोसे (ता. राजगुरूनगर) येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व मॉडर्न विद्यालय, भोसे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Pabal News) या वेळी तालुका क्रिडा अधिकारी आमसिद्ध सोलंकर, मॉडर्न विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश गवळी, खेड तालुका क्रीडा संघटनेचे माजी अध्यक्ष रामदास रेटवडे, खेड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे, शिवाजी विद्यामंदिरचे अण्णासाहेब कोडक, मुख्याध्यापक विष्णुपंत मेदगे, युवराज साळुंखे, खो-खो मार्गदर्शक धीरज दंडवते, विद्या प्रतिष्ठान बारामतीचे क्रीडा मार्गदर्शक मिटकरी, संदीप कोळेकर, संतोष काळे, रोहन सावंत, रमेश लोणारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pabal News : मतदानाचा अधिकार सुज्ञपणे बजावा – नायब तहसिलदार सचिन वाघ..
Shirur News : ‘घोडगंगा’च्या कामगारांचा संप तब्बल ९० दिवसांनंतर मागे
Shirur News : घनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी तिरसिंग जवळकर बिनविरोध