(Maharashtra Kesari )सांगली : महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. प्रतीक्षाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राज्यातील जवळपास ४०० हून अधिक महिला कुस्तीगिर दाखल…!
या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास ४०० हून अधिक महिला कुस्तीगिर दाखल झाल्या होत्या. 23 आणि 24 मार्च दरम्यान यास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील यांच्यात पारपडली. अखेर प्रतीक्षा बागडी वैष्णवी पाटीलला चितपट करून ही स्पर्धा जिंकली.
महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर प्रतीक्षाची पहिली प्रतिक्रिया…!
खूप छान वाटतंय. पहिली महाराष्ट्र महिला केसरीची गदा माझ्या खांद्यावर आलेली आहे. सगळ्यांचे कष्ट सार्थकी ठरलेली आहे. महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ठेवली हीच मोठी गोष्ट आहे. मी पैशांसाठी खेळलेली नाही. खूप मोठा मान मिळालेला आहे. माझ्या पूर्ण कुटुंबाला मी गदा अर्पित करते. माझ्यासोबत माझे वडील खूप कष्ट करत आहेत. माझ्या कुटुंबियांचा मला पूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या मेहनतीला हे यश आलेले आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.