(Kedar Jadhav’s Father found) पुणे : भारताचा क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. बेपत्ता झाल्याची तक्रार अलंकार पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला असता, ते सापडले असल्याचे समोर आले आहे. ते मुंढवा परिसरातील घोरपडी भागात सापडले आहेत.
कालपासून होते बेपत्ता…!
पुण्यातील कोथरूड भागातून काल सोमवारी (ता.२७ ) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पासून ते बेपत्ता झाल्याचे माहिती समोर आली होती. केदार जाधव याचा परिवार कोथरूड भागात राहयला आहे. महादेव जाधव यांनी काल सोमवारी (ता.२७ ) ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा घेऊन गेले.
मात्र , त्यांचा काहीच शोध लागत नव्हता. त्यांच्या जवळ असलेला फोन सुद्धा बंद होता. त्यामुळे ते हरवल्याची तक्रार अलंकार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. केदारच्या वडील महादेव जाधव यांनी स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. त्यामुळे त्यांच्या लक्षात अनेक गोष्टी राहत नाहीत. याकारणास्तव त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत.
दरम्यान, सोमवारी दुपारी बावणे बारा वाजण्याच्या सुमारास महादेव जाधव हे फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ गेले होते. ते बिल्डींगमधून बाहेर पडून कोठेतरी निघुन गेले. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नसल्याने त्यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ते मुंढवा परिसरातील घोरपडी भागात सापडले आहेत.