IND vs AUS Final: अहमदाबाद: आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा हा सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर 100 हून अधिक व्हीव्हीआयपी देखील या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार असणार आहेत.
या व्हीव्हीआयपी लोकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 8 हून अधिक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे शिष्टमंडळही सामना पाहण्यासाठी अहमदाबादला येणार आहेत. हा सामना पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि माजी न्यायाधीशही स्टेडियममध्ये जाणार आहेत. याशिवाय सिंगापूर, अमेरिका आणि यूएईचे राजदूतही अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला येणार आहेत.
केंद्रीय मंत्रीही स्टेडियमवर पोहोचणार आहेत. त्यांच्याशिवाय उद्योगपती लक्ष्मी मित्तलही सामना पाहण्यासाठी आपल्या कुटुंबासह येणारआहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, आरबीआय गव्हर्नर, गुजरात, तामिळनाडू आणि अनेक राज्यांतील आमदारही सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. त्याचबरोबर अनेक बॉलिवूड कलाकारही स्टेडियममध्ये दिसणार आहेत.
सामना पाहण्यासाठी येणार्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांची ही यादी:
- अनुराग सिंग ठाकूर,
- ज्योतिरादित्य सिंधिया
- आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास
- यूएस राजदूत एरिक गॅसेट्टी
- आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा सरमा
- ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी पीएम रिचर्ड मार्ल्स
- भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत फिलिप ग्रीन
- नीता अंबानी
- सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय. आणि इतर राज्यांच्या न्यायालयांचे न्यायाधीश
- यूएईचे राजदूत अब्दुलनासिर जमाल अलशाली
- मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा
- यूएसए राजदूत एरिक गार्सेटी
- सिंगापूर गृहमंत्री के संगम
- तामिळनाडू क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन
- लक्ष्मी मित्तल
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यासाठी जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सामन्यापूर्वी स्टेडियमची सजावट करण्यात आली आहे. त्यात अनेक प्रकारचे लाईट्स बसवले आहेत.
भारतीय संघ अपराजित
भारतीय क्रिकेट संघाने या विश्वचषकात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. साखळी सामन्यात आपले सर्व सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.