मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि कुसल मेंडिसच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ आमने-सामने येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक 2023 चा हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या संघाविरुद्ध रोहित आणि विराट कोहली यांचा रेकॉर्ड चांगला आहे. श्रीलंकेविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करण्याची टीम इंडियाला संधी आहे.
खरे तर, गेल्या दोन विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने श्रीलंकेचा सलग पराभव केला आहे. आता भारताने हा सामना जिंकला तर ती हॅट्ट्रिक असेल. विश्वचषक 2019 च्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. याआधी 2011 मध्येही त्यांचा पराभव झाला होता. आता 2023 मध्ये विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. विश्वचषकातील सामन्यांची आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघ समान पातळीवर आहेत. विश्वचषकात भारत आणि श्रीलंकेने एकमेकांविरुद्ध ४-४ सामने जिंकले आहेत.
विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने भारताचा सलग तीनदा पराभव केला आहे. श्रीलंकेने 1979 आणि 1996 मध्ये विजय मिळवला होता. 1996 मध्ये त्यांनी दोन सामने जिंकले. यानंतर टीम इंडियाने 1999 आणि 2003 मध्ये विजय मिळवला. 2007 मध्ये श्रीलंकेने पुनरागमन केले आणि आणि सामना जिंकला. यानंतर टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकले. 2011 आणि 2019 मध्ये भारताने विजय मिळवला होता.
श्रीलंकेविरुद्ध कोहली चांगली फलंदाजी करतो हे विशेष. श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने 52 सामन्यात 2506 धावा केल्या आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे. सचिनने 84 सामन्यात 3113 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 51 सामन्यात 1860 धावा केल्या आहेत.