पुणे : आशिया चषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येतील. या मैदानावर जो संघ नंतर चेस करतो त्याला सामना जिंकण्याची जास्त संधी असते.
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर होणार आहे. तसेच डिझ्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
टीम इंडियाचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग
पाकिस्तानचा संघ :
बाबर आझम(कर्णधार), मोहम्मद रिझवान फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाझ दहनी