पुणे प्राईम न्यूज: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान टीम इंडिया गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिल हा या सामन्यासाठी उपलब्ध नाही. डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरोधात मैदानात उतरणार नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात ट्रेविस हेड आणि सीन एबॉट प्लेईंग 11 चा भाग नाहीत.
भारताची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया की प्लेइंग इलेवन
ऑस्ट्रेलिया की प्लेइंग इलेवन: डेविड वॉर्नर, मिशेल मार्श, स्टीवन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कैमरन ग्रीन, एलेक्स कैरी (विकेटकीपर), ग्लेन मैक्सवेल, पैट कमिंस (कप्तान), मिशेल स्टार्क, जोश हेज़लवुड, एडम जाम्पा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना काटे की टक्कर असणार आहे. नुकतीच या दोन संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली, जी भारताने 2-1 ने जिंकली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने चेन्नईमध्ये आतापर्यंत एकूण 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत आणि फक्त 1 सामना गमावला आहे. तर चेन्नई येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 2 आणि भारताने फक्त 1 सामना जिंकला आहे.
हेही वाचा :
अखेर इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाशी झाला संपर्क, अडचणीनंतर अभिनेत्री सुरक्षितपणे परतणार भारतात
भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे सावट? काय आहे चेन्नईची हवामान स्थिती, जाणून घ्या सविस्तर
अफगाणिस्तान भूकंपाने हादरले, मृतांची संख्या 2,000 वर; तालिबानने मदत मागितली