पुणे: भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला जात आहे. पुण्यात दोन्ही संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकून बांगलादेश संघ प्रथम फलंदाजी करत आहे. त्याचवेळी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गोलंदाजी करताना जखमी झाला. त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले आहे.
बांगलादेशच्या डावातील नववे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला. मात्र, या षटकात त्याला केवळ 3 चेंडू टाकता आले. यानंतर भारतीय अष्टपैलू खेळाडूला मैदान सोडावे लागले. विराट कोहलीने हार्दिक पांड्याची ओव्हर पूर्ण केले.
हार्दिक पांड्या आज पुन्हा मैदानात येणार नाही
त्याचवेळी भारतीय चाहत्यांसाठी चांगली बातमी नाही. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीनंतर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हार्दिक पांड्याचे रुग्णालयात स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आज पुन्हा मैदानात दिसणार नाही. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हार्दिक पांड्या पुढच्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल की नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
भारत-बांगलादेश सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा नियमित कर्णधार शकीब अस हसन या सामन्यात खेळत नाहीये. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. बांगलादेशचे सलामीवीर तनजीद हसन आणि लिटन दास यांनी पहिल्या विकेटसाठी 14.4 षटकांत 93 धावा जोडल्या. यानंतर तनजीद हसन 43 चेंडूत 51 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कुलदीप यादवने तनजी हसनला आपली शिकार बनवले. तनजीद हसनच्या जागी नजमुल हुसेन शांतू फलंदाजीला आला आहे. सध्या बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतो आणि लिटन दास क्रीजवर आहेत. लिटन दास 48 चेंडूत 41 धावा करून खेळत आहे. तर नजमुल हुसेन शांतो 6 चेंडूत 2 धावा करून क्रीजवर आहे.
हेही वाचा:
Sharad Pawar: माढ्यामधून निवडणूक लढवणार की नाही? शरद पवारांनी सांगितला त्यांचा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आठ मोठे निर्णय!