मुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर त्यांचा मुलगा आर्यनने हार्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. शस्त्रक्रियेच्या 10 महिन्यांनंतर क्रिकेटपटूने आर्यनचे नाव बदलून अनाया असे केले आहे. त्याने एक इंस्टाग्राम रील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे या 10 महिन्यामध्ये झालेले परिवर्तन दिसून आले आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये एक क्रिकेटपटू, कोचची भूमिका निभावणारे संजय बांगर इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहलीच्या RCB चे कोच होते. पुरुषाची स्त्री म्हणजे आर्यनची अनाया बनल्यानंतर त्याने रविवारी रात्री सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. इन्स्टाग्राम हँडलवर 10 महिन्यांपासूनचा हार्मोनल चेंज संघर्षाचा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर केला आहे.
अनया झाल्यानंतर आर्यन खूश
मुलीत रुपांतर होऊन आर्यन आता अनया बनला आहे आणि तो खूप आनंदी आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले. पण या खेळाशिवाय, एक वेगळा प्रवासदेखील आहे, जो माझ्या स्वत:शी संबंधित आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील परिणाम हा माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.
दरम्यान, आर्यन बांगर हा देखील वडिलांसारखा क्रिकेटपटू आहे. तो डावखुरा फलंदाज आहे आणि इस्लाम जिमखाना या स्थानिक क्रिकेट खेळतो. याशिवाय तो लीसेस्टरशायरमधील हिंकल क्रिकेट क्लबसाठीही फलंदाज म्हणून खेळला आहे.
View this post on Instagram