Cricket News मुंबई : बांगलादेश दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. (Cricket News) ज्यामध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडेचे नाव नव्हते. (Cricket News) भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये नाव नसल्याचे समजल्यानंतर शिखा पांडे हिला रडू कोसळले होते. (Cricket News)
शिखा पांडे ही भारतातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तिने दिल्ली कॅपिटल्ससोबत डब्ल्यूपीएल उद्घाटनाचा हंगाम चांगला गाजवला होता. दिल्ली कॅपिटल्स संघ या हंगामात उपविजेता ठरला होता. यासोबत शिखा पांडे त्या संघाची सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली. या वर्षांच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वचषकासाठी उजव्या हाताची वेगवान गोलंदाज भारतीय संघात परतली होती. यानंतर शिखा पांडेला केंद्रीय करारातून वगळण्यात आले.
आता बांगलादेशमध्ये होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी शिखा पांडेची भारतीय संघात निवड झाली नाही. जेव्हा मला संघातून वगळण्यात आले तेव्हा मला वाटले की क्रिकेटपासून दूर राहणेच योग्य आहे. तेव्हा सल्ला देण्यात आला की तुला स्वतःला वेळ देण्याची गरज आहे. माझ्यात बरेच क्रिकेट उरले आहे. जोपर्यंत मी खेळण्याचा आनंद घेत आहे तोपर्यंत मी खेळत राहिले. या क्षणी मी नाराज आहे. परंतु मला ज्या परिस्थितीत टाकले आहे, यातून कसे बाहेर पडायचे हे माझ्या हातात आहे, असे शिखाने म्हटले आहे.