मिरपूर : बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर शाकिब अल हसनने कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. शाकिब अल हसन हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची अखेरची कसोटी खेळणार आहे. सध्या शाकिब भारत दौऱ्यावर आहे.
2007 च्या टी20 वर्ल्ड कपपासून 2024 च्या प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये तो खेळलेला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या नावावर 50 विकेट घेण्याचा विक्रम जमा आहे.
शाकिब अल हसन त्याची अखेरची कसोटी मिरपूरमध्ये खेळणार आहे. परंतु, शाकिबसाठी बांगलादेशमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर मात्र त्याला अखेरची कसोटी खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. अशी माहिती समोर येत आहे.