मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका संपण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 T20, 3 ODI आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. बीसीसीआयने तिन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला वनडे आणि टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुल एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व करेल तर टी-20 मध्ये सुर्यकुमार यादवकडे नेतृत्व असेल. रोहित शर्मा कसोटीत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
रोहित शर्मा T20 मध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन करण्याबाबत अटकळ बांधली जात होती. पण, रोहित आणि विराटने एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून विश्रांतीची मागणी केल्याचे बीसीसीआयने सांगितले. याशिवाय फिटनेसच्या समस्येमुळे मोहम्मद शमी या दोन्ही मालिकेतून बाहेर राहणार आहे. मात्र, हे तिन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटीत पुनरागमन करतील. याशिवाय युवा फलंदाज शुभमन गिलचा टी-20 मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे, तर एकदिवसीय सामन्यात त्याच्या जागी साई सुदर्शनला स्थान देण्यात आले आहे. संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि रजत पाटीदार यांचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.
टी-20 मालिकेसाठी संघ
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र यादव, रवींद्र यादव , अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
वनडे मालिकेसाठी संघ
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, अविनाश कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
कसोटी मालिकेसाठी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.