Asia Cup 2023 पुणे : विश्वचषक 2023 च्या वेळापत्रकानंतर आता सर्वांच्या नजरा आशिया कप 2023 च्या वेळापत्रकाकडे लागल्या आहेत. यावेळी या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले असले तरी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. (Asia Cup 2023) वास्तविक, भारताने आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे पीसीबीने आशियाई क्रिकेट परिषदेसमोर एक हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला आहे. (Asia Cup 2023) ज्यामध्ये भारत वगळता ग्रुप स्टेजचे 4 सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील, तर सर्व फायनलसह इतर सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. (Asia Cup 2023)
या सामन्यांचे स्थळ निश्चित करण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषद, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट यांच्याशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. असे सांगण्यात येत आहे की, एसीसी या आठवड्यात एशिया कप 2023 चे वेळापत्रक जाहीर करू शकते. वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर हा सामन्याच्या मैदानामुळे होत आहे.
यजमानपदासाठी लाहोर आणि दांबुला ही पसंतीची ठिकाणे आहेत. कोलंबो हा देखील याआधी पसंतीचा पर्याय होता पण पावसाळ्यामुळे हा प्लॅन बदलावा लागला. मात्र, श्रीलंकेतील ठिकाणांबाबत या आठवड्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आता सांगण्यात आले आहे.