T20 World Cup मुंबई: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला होणार आहे. त्याचबरोबर भारत-अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा करू शकतात. याशिवाय आयपीएलदरम्यान ३० खेळाडूंवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. या ३० खेळाडूंमधून विश्वचषकासाठी संघ निवडला जाईल, असे मानले जात आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपचा भाग होणार का?
खरंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. या कारणास्तव संघ निवड निवडकर्त्यांसाठी सोपी नसेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली नोव्हेंबर 2022 मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये शेवटचे खेळले होते. तेव्हापासून हे दोन्ही दिग्गज भारताकडून टी-२० खेळलेले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 साठी संघ निवडण्यापूर्वी निवड समितीला हे स्पष्ट करायचे आहे की रोहित-विराट त्यांच्या प्लॅनमध्ये आहेत की नाही, म्हणजेच हे दोन्ही खेळाडू टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळतील की नाही.
रोहित-कोहली अफगाणिस्तान मालिकेला मुकणार?
T20 विश्वचषक यावर्षी मे-जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. त्याचवेळी याआधी आयपीएल 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. आयपीएल 2024 दरम्यान, 30 सर्वोत्तम खेळाडूंवर लक्ष ठेवले जाईल. त्यानंतर या खेळाडूंमधून संघाची निवड करावी लागेल. तसेच, रोहित शर्मा आणि विराट कोहली अफगाणिस्तान मालिकेत खेळणार की नाही हे सध्या स्पष्ट झालेले नाही. भारत-अफगाणिस्तान मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या खेळण्यावर साशंकता आहे.