Kedgaon News : केडगाव, (पुणे) : जानेवारी महिन्यात लेक्सीकन स्कुल वाघोली येथे अपघातात सुप्रिया सजित ढोबळे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांचे पती सजीत ढोबळे यांनी पोस्टाची विमा पॉलीसी काढली असल्याने मृत महिलेच्या पतीला आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेमुळे सुमारे दहा लाख रुपयांची विमा रक्कम मिळाली आहे.
सुमारे दहा लाख रुपयांची विमा रक्कम मिळाली
सजीत ढोबळे हे केसनंद येथील टाटा याझकी कंपनीमध्ये काम करतात. नवीनच आलेल्या भारतीय डाक विभागाच्या ३९९ मध्ये दहा लाखांचा अपघाती विमा या पॉलीसीचा पोस्टमन नामदेव गवळी यांनी वरिष्ठ अधिकारी योगेश वीर यांच्या मार्गदर्शनाने टाटा याझकीमध्ये मेळावा घेतला होता. या मेळाव्यात सजीत ढोबळे यांनी त्यांचा व पत्नीचा अपघाती विमा उतरवून घेतला होता.
त्यानंतर महिनाभरातच काळाची वक्रदृष्टी ढोबळे यांच्या कुटुंबावर पडली आणि सुप्रिया ढोबळे यांचा रस्ते अपघातात करुण अंत झाला. Kedgaon News
पोस्टाची विमा पॉलीसी काढली असल्याने मृत महिलेच्या पतीला आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेमुळे सुमारे दहा लाख रुपयांची विमा रक्कम मिळाली. पोस्टाचा व टाटा एआयजीचा विमा काढल्यामुळे ढोबळे कुटुंबाला आर्थिक हातभार लाभला आहे.
ढोबळे यांच्या पश्चात पती,सासू, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सजित ढोबळे यांना हा अपघाती विमा मिळाल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ” या रकमेचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे. पैशांनी गेलेली व्यक्ती परत येत नाही पण मुलांच्या भवितव्यासाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे.”
या क्लेमसाठी पोस्टमन नामदेव गवळी यांनी सतत पाठपुरावा केला होता. वेळोवेळी संबंधित कंपनीच्या अधिकार्यांना विचारणा करुन त्यांनी भांडावून सोडले होते. शवविच्छेदन अहवाल, पंचनामा तसेच काही अडचण निर्माण झाली तर गवळी यांनी स्वतः तिचे निराकरण केले. ‘पोस्टमन गवळी यांनी शब्द दिला होता म्हणून मी आशावादी होतो अन्यथा माझी एकट्याची विमा कंपनीशी लढण्याची ताकद नव्हती’ असे श्री ढोबळे म्हणाले. Kedgaon News
दरम्यान, पोस्टमन गवळी हे पोस्टाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. पत्र वाटताना येणारे अनुभव ते किस्से पोस्टमनचे या सदरात लिहितात. भारतीय डाक विभागाच्या योजना अत्यंत लाभदायक आहेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे गवळींनी आवाहन केले आहे. Kedgaon News