राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे आज यवत गाव बंद ठेवून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. या दरम्यानच्या काळात यवत परिसरात राजकीय नेत्यांना आणि पुढार्यांना सभा तसेच कार्यक्रम घेऊ दिला जाणार नाही, असा इशाराही सकल मराठा समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.
पुढाऱ्यांना सभा, कार्यक्रम घेऊ देणार नाही
श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये सोमवारी (ता. ३०) विशेष ग्रामसभा झाली. त्यानंतर रात्री सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण गावात कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. (Yavat News) या वेळी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. या मोर्चाला संबोधित करताना मंगळवारी (ता. ३१) ‘गाव बंद’ करण्याची साद घालण्यात आली. याला संपूर्ण पाठिंबा देत यवत गावातील व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद पाडून यवत गावाच्या वतीने मनात जरांगे पाटील यांना पाठिंबा व्यक्त केला.
यवत येथील काळभैरवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सकल मराठा बांधवांकडून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. (Yavat News) या वेळी सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सदानंद दोरगे, नाथदेव दोरगे, ग्रामपंचायत सदस्य गौरव दोरगे, गणेश शेळके, विलास दोरगे, राजू रंधवे यांसह अनेक समाज बांधव या उपोषणात पहिल्या दिवशी सहभागी झाले.
मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी अद्यापही पूर्ण केलेली नाही. गेली ४० वर्षे मराठा समाजाची केंद्र आणि राज्य सरकार फसवणूक करत आहे. (Yavat News) आजपासून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे साखळी उपोषण सुरू केले असून, सरकारने टिकणारे उपोषण देऊन मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या थांबवाव्यात. जोपर्यंत जरांगे पाटील हे उपोषण करणार आहेत, तोपर्यंत साखळी उपोषण चालूच राहणार, असे मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यानच्या काळात यवत परिसरात कोणत्याही नेत्यांना, पुढाऱ्यांना सभा, कार्यक्रम घेऊ देणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय न झाल्यास गाव बंद; यवतच्या विशेष ग्रामसभेत निर्णय
Yavat News : सहजपूर येथे अपंगांसाठी ब्लॅंकेट वाटप अन् स्नेहभोजन