राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या दौंड तालुका अध्यक्ष निर्मला महादेव राऊत व युवक कार्यकर्ते विजय महादेव राऊत यांनी दसऱ्याचे औचित्य साधून अपंगांसाठी १०० ब्लॅंकेट वाटप आणि स्नेहभोजनाचे सहजपूर येथे आयोजन केले होते.
दसऱ्याचे औचित्य साधून आयोजन
या वेळी मनोगत व्यक्त करताना निर्मला राऊत म्हणाल्या की, प्रहार संघटनेत काम करत असताना अपंग बांधवांच्या हाल-अपेष्टा पाहून अस्वस्थता येत होती. माझी मुलगी ८० टक्के अपंग असून, अपंगांची समस्या मी खूप जवळून अनुभवत आहे. (Yavat News ) आपणही समाजासाठी काही देणे लागतो, या भावनेने पती महादेव राऊत, मुलगा विजय राऊत यांच्याशी चर्चा करून दसऱ्याच्या मुहूर्तावर १०० ते १२५ अपंग बांधवांना ब्लॅंकेट वाटप करायचा निर्णय घेतला. अपंगांसाठी जीवात जीव असेपर्यंत कार्यरत राहण्याचा मानस आहे.
उमेश म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. निर्मला राऊत या आपल्या अपंग मुलीला सांभाळण्यासाठी घरीच असतात तर महादेव राऊत व विजय राऊत सरकारी नोकरीत नसताना तोकड्या पगारावर काम करतात. (Yavat News ) तरी देखील आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हा समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल निर्मला राऊत यांच्या इच्छाशक्तीचे सहजपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जगताप, तालुकाध्यक्ष बाळासाहेब नानवर, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे, माजी उपसभापती सुशांत दरेकर, माजी सरपंच मीनाक्षी म्हेत्रे, दौंड मार्केट कमिटीचे संचालक जीवन म्हेत्रे, माजी सरपंच चांगदेव म्हेत्रे, निलेश म्हेत्रे, उपसरपंच रोहित म्हेत्रे, प्रदीप गायकवाड, रामदास बोराटे, महेश म्हेत्रे, प्रदीप म्हेत्रे, दादासाहेब बागडे, गणेश म्हेत्रे, आबा थोरात यांसह दिव्यांग बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : मासे पकडू देत नाही म्हणून, मिरवडीत एकाला लोखंडी रॉडने मारहाण
Yavat News : यवतच्या रश्मी दरेकर ठरल्या ‘होम मिनिस्टर’मधील पैठणीच्या मानकरी