राहुलकुमार अवचट
Yavat News :यवत : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त यवत गावातील श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने आयोजन
पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यवतची ग्रामदेवी श्री महालक्ष्मी माता मंदिरात नवरात्रोत्सवात दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. दरवर्षी श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्यावतीने श्री महालक्ष्मी माता नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. (Yavat News) यावर्षीही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती गणेश शेळके यांनी दिली.
नवरात्र उत्सव काळात नऊ दिवस श्री महालक्ष्मी मातेची विविध रूपातील अलंकारिक पूजा करण्यात येणार असून, पारंपरिक दागिन्यांबरोबरच देवीला नऊ दिवस, नऊ विविध रंगांची वस्त्रे परिधान करण्यात येणार आहेत. (Yavat News) नऊ दिवसांतील, नऊ रूपातील पूजा पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
नवरात्र उत्सवानिमित्त रोज रात्री ९ वाजता दांडिया कार्यक्रम, बुधवारी दुपारी २ वाजता पाककला स्पर्धा, रात्री ८ वाजता जगप्रसिद्ध जादूगार रघुराज यांचे जादूचे प्रयोग, गुरुवारी सायंकाळी चार वाजता देवीची भव्य तोरण मिरवणूक व महाभोंडला, रात्री ९ वाजता शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टी यांचा जागरण-गोंधळ, शनिवारी सायंकाळी ७ वाजता भव्य दीपोत्सव, रविवारी दुपारी २ वाजता चित्रकला स्पर्धा, रात्री ८ वाजता खास महिलांसाठी निलेश बोरकर प्रस्तुत होम मिनिस्टर, सोमवारी रात्री ८ वाजता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला शशिकांत कोठावळे प्रस्तुत ‘तुझ्यात जीव रंगला’ हा मराठमोळ्या लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Yavat News) मंगळवारी (ता. २४) दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पालखी आगमनानंतर रावण दहनाच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होईल.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गरबा व दांडिया खेळण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी माता मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : राहुमध्ये ढोल, ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत बैलांची वाजतगाजत मिरवणूक