Yavat News : यवत, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर कासुर्डी ग्रामपंचायत हद्दीतील टोलनाका येथे चारचाकी गाडीतून गोमांस वाहतूक करणाऱ्या सहा जणांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी (ता. ०४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. (A case has been registered in Yawat Police Station against 6 persons transporting beef in Kasurdi Toll Naka area.)
दौंड खाटिकगल्लीतील तिघे पोलिसांच्या ताब्यात
शाहअलम सलीम कुरेशी (वय २८) अब्दुलसलाम सलीम कुरेशी (वय १९) सलमान सलीम कुरेशी (वय ३१ तिघेही रा. शांतीनगर येरवडा, पुणे) निशार अहमद कुरेशी, जीमल कुरेशी, फैजान कुरेशी, रा. तिघेही कुरेशी मोहल्ला, खाटीक गल्ली, दौंड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्याकडे धारधार लोंखडी कोयताहि मिळुन आला आहे. (Yavat News ) याप्रकरणी पोलीस शिपाई तात्याराम करे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी यवत पोलीस गस्त घालीत असताना पोलिसांना एक चारचाकी संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सदर चारचाकी गाडी थांबवून गाडीत असलेल्या व्यक्तींकडे विचारपूस केली. (Yavat News ) तसेच गाडीची पाहणी केली त्यावेळी गाडीमध्ये गोमांस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ सहाजणांना ताब्यात घेतले.
दरम्यान, यवत पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. तसेच त्यांच्या गाडीचे सीटखाली धारधार लोंखडी कोयता मिळुन आला आहे. याबाबत पोलीस शिपाई तात्याराम करे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Yavat News ) त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोसावी हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी घेतला पालखी तयारीचा आढावा