राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : कर्नाटक राज्यातील ई.आय.डी. पाॅरी (इंडीया) लिमिटेड, बागलकोट या साखर कारखान्याने यवत येथील कुदळे अॅग्रो फूड यांना ४ ट्रकच्या माध्यमातून पाठविलेली २८ लाख ३१ हजार २२० रुपये किमतीची ८४ टन साखर एजंटने परस्पर लांबवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
एजंटविरोधात गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२२ ते २ मार्च २०२३ या कालावधीत यवत गावच्या हद्दीतील (Yavat News) कुदळे अॅग्रो फूड या ऑफिसमार्फत कर्नाटक राज्यातील ई.आय.डी. पाॅरी (इंडीया) लिमिटेड, बागलकोट या साखर कारखान्याने पाठविलेली २८ लाख ३१ हजार २२० रुपये किंमतीची एकूण ४ ट्रकमधील ८४ टन साखरेची एजंट सोमनाथ रंगनाथ असवले याने कोणतीही माहिती न देता, परस्पर विल्हेवाट लावून आर्थिक फसवणूक केली आहे.
याबाबत तानाजी बाजीराव कुदळे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून,(Yavat News) त्यावरून एजंट सोमनाथ रंगनाथ असवले (रा. वडगाव काटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) याच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस नाईक चोरमले करीत आहेत.