Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची; ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.अ. ल. देशमुख यांचे प्रतिपादन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 October 2023, 15:44

राहुलकुमार अवचट

 

Yavat News : यवत : नवीन शिक्षण धोरणात अनेक चांगल्या संकल्पना मांडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास करणे व त्याचे भवितव्य उज्ज्वल घडणे शक्य आहे. परंतु त्यासाठी शिक्षकांची भूमिका बदलणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांची भूमिका या धोरणाच्या अंमलबजावणीत अत्यंत महत्त्वाची असणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी केले.

न्यू इंग्लिश स्कूल आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

खंबेश्वर शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, खामगाव येथील शाळेत ‘नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षकांची भूमिका’ याविषयी बोलताना डॉ. अ. ल. देशमुख यांनी हे मत मांडले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष माणिकराव नागवडे, कार्याध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, सचिव विकास जगताप, मुख्याध्यापक नेवसे यांसह अन्य पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Yavat News) न्यू इंग्लिश स्कूल आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य प्रसेनजीत फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.

या वेळी समाज परिवर्तनाच्या कार्यात शिक्षकांचा सक्रिय सहभाग परिवर्तनाची गती वाढवणारा ठरतो, असे प्रतिपादन भिमाले यांनी केले. शिक्षण संस्थांच्या अशा छोट्या-छोट्या प्रयत्नांतूनच विद्यार्थ्यांच्या विकासाच्या नवनवीन योजना कार्यान्वीत होतील. या योजनांमुळेच विद्यार्थ्यांचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल. (Yavat News) अशा कार्यशाळा आयोजित करणारे संस्थाचालक नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन प्रसेनजीत फडणवीस यांनी केले. या कार्यशाळेत विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

शिक्षकी पेशा सोडून डी.आयसी.सी.आय.च्या व्यावसायिक वातावरणात आपला ठसा उमटवणाऱ्या सीमा कांबळे यांनी नवीन शिक्षण धोरणातील पंचकोष विकास या संकल्पनेची स्पष्टता केली. तर उद्योजकतेसाठी विद्यार्थ्यांची जडणघडण शालेय शिक्षणातूनच झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (Yavat News) नवकल्पना करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध, त्यांचे प्रशिक्षण व त्यांना व्यवसायातून मिळणाऱ्या सन्मानाची जाणीव शिक्षकांनी करून दिली पाहिजे, अशी अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली.

एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. सुरेंद्र निरगुडे यांची मुलाखत प्रा. शरदचंद्र बोटेकर यांनी घेतली. यामध्ये शिक्षकांचे हक्क, कर्तव्य, संस्थेच्या जबाबदाऱ्या व नवीन शिक्षण धोरणात याबाबत असलेल्या स्पष्ट सूचना यांचे विवेचन झाले. (Yavat News) यानिमित्ताने अनेक शंकांचे स्पष्टीकरण प्रा. निरगुडे यांनी केले. विविध खेळांच्या माध्यमातून व उपलब्ध साहित्यातून विद्यार्थ्यांची सृजनशीलता, औत्सुक्य व नवनिर्माणाची उर्मी जागवता येते. यासाठी काही खेळांच्या आधारे विलास कुलकर्णी यांनी शिक्षकांना प्रशिक्षित केले.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी कार्याध्यक्ष श्रीपाद ढेकणे यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला ज्या प्रकारचे शिक्षण व सुविधा त्याच्या शाळेत मिळाव्यात अशी आपली अपेक्षा असते, त्याच प्रकारचे शिक्षण व सुविधा आपण आपल्या शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना देतो आहोत का, यावर सर्वांना आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले. (Yavat News) या प्रकारच्या कार्यशाळा या नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नक्कीच मार्गदर्शक व मैलाचा दगड ठरतील, अशी भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. अशा कार्यशाळा व त्यासाठी आवश्यक असणारा खर्च हा संस्थाचालकांनी करून शिक्षकांची मानसिकता निर्माण केली पाहिजे, अशी या वेळी चर्चा झाली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Yavat News : कर्नाटकमधून आलेली २८ लाखांची ८४ टन साखर परस्पर लांबवली

Yavat News : रोटी घाटात चौघांनी दुचाकीस्वारास लुटले

Yavat News : पाटस येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन चोरट्यांना अटक…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

Saturday, 2 May 2026, 21:10

Manohar Bhosale News : भोंदू मनोहर भोसलेला थोडासा दिलासा; पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी

Saturday, 2 May 2026, 19:12

Pune Crime News : नसरापूरनंतर चाकण हादरले; तीन वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार करून हत्या, १६ वर्षीय आरोपी अटकेत

Saturday, 2 May 2026, 19:02

Pune Drug News : कोंढव्यात ‘ड्रग्ज माफिया’वर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजासह महिला-युवक जेरबंद, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 2 May 2026, 18:27

MIT News : फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख – संतोष कटारिया

Saturday, 2 May 2026, 18:02

Speed ​​Bump : उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील गतिरोधक की मृत्यूचा सापळा? ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात ; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Saturday, 2 May 2026, 17:53
Next Post

Pimpri News : "जनसंख्या वाढली पण माणूस हरवत चालला आहे!":समाजसेवक अण्णा हजारे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.