Thursday, June 12, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यशवंत’च्या 99.27 एकर जागेची 299 कोटींना विक्री होणार; कारखाना आणि बाजार समितीच्या संचालक मंडळाकडून ठराव मंजूर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 29 March 2025, 14:12
Bombay high court issues notice in Yashwant Sugar Factory case pune

लोणी काळभोर (पुणे): थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची सुमारे 99.27 एकर जमीन 299 कोटी रुपयांमध्ये विक्री आणि खरेदीचा ठराव शुक्रवारी (दि. 28) ) कारखाना आणि बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. आता, या व्यवहाराला अंतिम मान्यता मिळण्यासाठी साखर आयुक्तांनी परवानगी देणे आवश्यक आहे.

यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळाकडून कारखान्याची देणी देणे आणि भांडवल उभारणीसाठी स्वमालकीची 99.27 एकर जमीन सुमारे 335 कोटी एवढ्या रकमेस विक्री करण्याचा प्रस्ताव पुणे बाजार समितीस 30 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता. विशेष म्हणजे शुक्रवारी झालेल्या बैठकीत कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन 299 कोटी रुपयांत विक्री आणि खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे. बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या बैठकीसाठी बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, संचालक प्रतापराव गायकवाड, बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्यासह इतर संचालक मंडळ उपस्थित होते.

बाजार समिती आणि कारखान्याच्या संचालक मंडळाची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये कारखान्याची जमीन 299 कोटी रुपयांना बाजार समितीला देण्याचा निर्णय झाला. इतर शासकीय परवानग्या घेऊन ही जागा विकत घेतली जाईल, असे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी सांगितले.

सध्याच्या रेडरिकनरनुसार 99.27 एकर जमिनीची किंमत अंदाजे 335 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. कारखान्याच्या जमीन खरेदीसाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमय) अधिनियम 1963 च्या कलम 12 (1) नुसार प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु, सदर जमीन खरेदीच्या दराबाबत काही त्रुटी आढळून आल्या असल्याने ही प्रक्रिया काहीशी रखडली आहे. दरम्यान दोन्ही संस्थांचे संचालक मंडळ आणि महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने उपबाजार आवाराकरिता जमीन खरेदीचा विचार बाजार समितीने केला होता. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमय) अधिनियम 1963 मधील कलम 11 (1) नुसार सध्याच्या रेडरिकनर दराने या 99.27 एकर जमिनीची बाजार किंमत 335 कोटी रुपये एवढी असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, शेतकरी व बाजार घटकांच्या सुविधांसाठी जागेची आवश्यकता ओळखून पुणे बाजार समितीने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून कोरेगाव मूळ (ता. हवेली, जि. पुणे) येथील 12 एकर जमीन 53 कोटी 17 लाख 88 हजार 704 रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर 5 जुलै 2024 रोजी जिल्हा उपनिबंधकांनी या जागेला उपबाजार आवार म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. आता यशवंतच्या जमीन खरेदीसाठी निधी उभारणीकरिता कोरेगाव मूळ येथील उपबाजाराची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेण्याचाही पर्याय विचारात घेतला जात आहे. पणन संचालकांच्या मान्यतेनंतर या सर्व गोष्टींना अंतिम स्वरूप मिळू शकते.

दरम्यान, साखर आयुक्तांची परवानगी व यानंतरच्या प्रक्रियेवर परिसरातील सर्वांचे लक्ष लागले आहे. जर हा व्यवहार अंतिम टप्प्यात गेला, तर बाजार समितीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Crime News: भारतात व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकाकडून महिलेची हत्या; कारण आले समोर

Thursday, 12 June 2025, 15:57
know All about the Boeing 787-8 Dreamliner

विमानाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर यापूर्वीही सापडले होते वादात; नेमकं कारण काय….जाणून घ्या सविस्तर

Thursday, 12 June 2025, 15:54

रिक्षातून पाच मुलांची वाहतूक करण्याचे आदेश; शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली लागू

Thursday, 12 June 2025, 15:40

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात; नागरी वस्तीत कोसळलं विमान, जिवितहानीची शक्यता

Thursday, 12 June 2025, 15:28

सनी रॉय हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून उलगडा; सोशल मीडियाच्या मदतीने ओळख पटवली, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 12 June 2025, 14:54

बाथरुम साफ करण्यास नकार दिल्याने पाच अल्पवयीन मुलांकडून एका सतरा वर्षीय मुलाचा खुन करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Thursday, 12 June 2025, 14:36
Next Post

बंगळुरु हत्या प्रकरण; फॉरेन्सिक तपासातून धक्कादायक माहिती आली समोर...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.