World Disabilities Day 2023 :राजु देवडे/ लोणी धामणी ( पुणे ) : जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून लोणी ( ता.आंबेगाव ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच सावळेराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन व सरकारी योजना माहिती व हक्क प्राप्त करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी. या उद्देशाने दिव्यांग दिन साजरा करण्यात आल्याचे दिव्यांग आघाडी भाजपा आंबेगाव अध्यक्ष प्रकाश सिनलकर यांनी सांगितले. यावेळी लोणी गावातील अनेक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सतीश थोरात, माजी उपसरपंच अनिल पंचरास, ग्रा.प. सदस्य वैशाली उदागे, प्रकाश गायकवाड उपस्थित होते. सरपंच सावळेराम नाईक यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमचे सूत्रसंचालन व आभार हर्षल सुतार यांनी केले.