बारामती, (पुणे) : बनावट महिला (fake woman) उभी करून कॅनडामध्ये (Canada) असलेल्या मुलाच्या बनावट सह्या (signature) करीत बारामतीतील (Baramati) एका महिला (One Women Doctor) डॉक्टरची जमीन हडप (grab the land) करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात (5 persons in Baramati) फसवणूकीचा (fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच जणांवर गुन्हा दाखल..!
मंगेश विलास काळे (रा. रामवाडी, गोपाळवाडी, ता. दौंड), एक अनोळखी महिला, राहूल सुरेश माने (रा. दौंड), किरण पाटील (रा. थेरगाव, पुणे), शिवराज हनुमंत थोरात (रा. सूर्यनगरी, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विद्या शांताराम शिंदे (रा. हेरिटेज सोसायटी शास्त्रीनगर, येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या शिंदे या डॉक्टर आहेत. तसेच त्या वडीलांकडील नाव लावतात. त्यांचा मुलगा रोहित यशवंत डोईफोडे हा चार वर्षांपासून कॅनडा येथे आहे. शिंदे यांनी बारामतीत डॉ. कमलाकर कोल्हटकर यांच्याकडून १९९४ साली जागा खरेदी केली होती. त्यामुळे सदर जागा हि अनेक दिवसांपासून पडीक आहे.
रविवारी (ता. १२) एका वृत्तपत्रात एक नोटीस आली होती. त्या नोटीसनुसार हा प्लॉट मंगेश काळे याच्या नावे असल्याचे फिर्यादी शिंदे यांना समजले. त्यांच्या मुलाचा मित्र ऋषिकेश जगताप यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून याची माहिती घेतली. त्यावेळी हा प्लॉट काळे या व्यक्तिने हवेली येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस महिला उभी करत कुलमुखत्यार करून घेतला असल्याचे लक्षात आले. साक्षीदार म्हणून राहून माने व किरण पाटील यांच्या सह्या असल्याचे त्यांनी सांगितले.
काळे याने कुलमुखत्यार पत्राच्या आधारे बोगस महिला उभी करून बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात फिर्यादीचा प्लॉट १३ लाख रुपयांना खुशखरेदी करून घेतल्याचे दिसून आले. त्यासाठी पुन्हा त्याच महिलेचे फोटो जोडून फिर्यादीची बनावट सही केली आहे. साक्षीदार म्हणून रोहित डोईफोडे यांची खोटी सही केली आहे. परंतु फिर्यादीचा मुलगा रोहित हा या काळात कॅनडा येथेच होता. अजूनही तो तिकडेच आहे. या खरेदीदस्तावर शिवराज थोरात याने ओळखीची सही केली आहे.
दरम्यान, शिंदे यांनी लावलेला फलक काढून टाकण्यात आला आहे. तसेच बारामती तलाठी कार्यालयात माहिती घेतली असता काळे याने त्यांचे नाव कमी करून स्वतःचे नाव लावत फेरफार मंजूर करून घेतला आहे. त्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी हितसंबंधितांना नोटीस बजावल्याचे नमूद केले आहे. परंतु अशी कोणतीही नोटीस फिर्यादीला आलेली नाही.Baramati : वडीलांची आठवण जपण्यासाठी पालखी मार्गात येणारी इमारत उचलून चक्क ९ फुट मागे घेण्याचा निर्णय ; व्हिडीओ व्हायरल..!
Baramati Crime News : अपघातात मयत झालेल्या ७० वर्षीय वडिलांच्या विरोधात मुलाची पोलीस ठाण्यात तक्रार