Weather Updates : पुणे : राज्यात पुढचे ५ दिवस कोकणात आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार, पुणे, सातारा, नाशिकमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. (Weather Updates) तसेच मराठवाड्यामध्येही पावसाचा जोर राहणार असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. (Weather Updates)
मुंबईसह, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे अतिवृष्टी झाली आहे. (Weather Updates) येथे शनिवारी ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंदगडमध्ये पावसाचा जोर अधिक राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. (Weather Updates)
मुंबई शहर व उपनगरात आज (शनिवार) पहाटेपासून मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. (Weather Updates) त्यामुळे सकल भागात पाणी साचले होते. मात्र याचा शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला नाही. मध्य व पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवाही वेळापत्रकानुसार सुरू होती. (Weather Updates)
मुंबई व उपनगरात आज पडलेल्या पावसामुळे मान्सून दाखल झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र मान्सून येत्या दोन ते तीन दिवसात दाखल होईल, असे वेधशाळेकडून सांगण्यात येत आहे. (Weather Updates)
दरम्यान, मुंबई शहर व उपनगरात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे दादर, सायन, अंधेरी, सांताक्रुझ, बोरीवली, गोरेगाव, कुर्ला आदी ठिकाणी सकल भागात पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगली धावपळ उडाली. (Weather Updates)