weather update : पुणे : थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पहाटे तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. आज पहाटे पाषाणमध्ये वर्षातील सर्वात थंड तापमान नोंदवलं गेलं. पाषाणमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. तर शिवाजीनगरमध्ये 12 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पुणेकर गुलाबी थंडी अनुभवत आहेत.
22 डिसेंबरपासून वाऱ्याचा पॅटर्न पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे निर्माण होऊन सायंकाळपासून किमान तापमानात काही दिवस हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तास ही थंडी कायम राहणार असून त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या पुणे येथील अंदाजानुसार व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण-आग्नेय द्वीपकल्पातून काही प्रमाणात आर्द्रता येत असल्याने आर्द्रतेत वाढ होत आहे. त्यामुळे पुढील 48 तास तापमान सध्याच्या पातळीवरच राहणार आहे. राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून या वेळी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातही तापमानात घट होणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
वातावरण कसं असेल?
21 डिसेंबर- आकाश निरभ्र,सकाळी धुक्याची शक्यता
22 डिसेंबर-आकाश निरभ्र, संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता
23 डिसेंबर- आकाश निरभ्र
24 डिसेंबर- आकाश निरभ्र
25-डिसेंबर- आकाश निरभ्र