बापू मुळीक
सासवड: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील गुरोळी येथे कानिफनाथ मंदिर व महादेव मंदिर कैलास मठ या ठिकाणी राज्यमंत्री इंद्रणील नाईक यांचे खाजगी सचिव प्रशांत खेडेकर, यांच्या माध्यमातून या देवस्थानास पर्यटन म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत या ठिकाणी वन विभागातर्फे कामे सुरू आहेत. यात वनविभागाच्या वतीने येथील प्राण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. वन विभागातील प्राण्यांना पाण्याची टंचाई जाणवत असल्याने, त्यांची धाव मानवी वस्तीकडे येऊ लागली आहे. यामुळे प्राण्यासाठी वन विभागात पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून गुरोळी वनविभागात कृत्रिम पानावटा बनवण्यात आला.
उन्हाळ्याची दाहकता वाढली असून माणसाबरोबरच वन प्राण्यांनाही तेवढीच पाण्याची आवश्यकता आहे. कानिफनाथ मंदिर परिसरात हरीण, ससे व इतर प्राण्यांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी झाडांच्या प्रतिकृतीत बनवलेली उन्हापासून संरक्षणासाठी बसण्यासाठी बनवलेली टोपीचे काम पूर्ण केले आहे.
वन विभागाच्या पाणवठ्यात पाणी सोडताना झिरो फाउंडेशन व शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्टचे सदस्य अक्षय खेडेकर, शंभू खेडेकर, संतोष खेडेकर, सचिन भंडलकर, जालिंदर खेडेकर, प्रदीप खेडेकर, आदी उपस्थित होते.