वाघोली, (पुणे) : येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अशी माहिती वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव यांनी दिली. (Wagholi News)
वाघेश्वर मंदिर हे पुरातन कालीन मंदीर आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मात्र शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पावित्र्य भंग पावत आहे. अन्य भविकांचीही तशी ट्रस्ट कडे तक्रार आहे. मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी प्रतिष्ठाणने हा निर्णय घेतल्याचे सातव यांनी सांगितले. तसे फलक मंदिरात लावण्यात आले आहे. (Wagholi News)
दरम्यान, पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. या निर्णयाचे स्वागत वाघोलीतील नागरिकांनी व भाविकांनी केले असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रामदास दाभाडे यांनी सांगितले. (Wagholi News)