बापू मुळीक
सासवड: पुरंदर तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीपदी वैभव डुबल यांची नियुक्ती झाली आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. कराड (जि.सातारा) येथील वैभव डुबल यांनी अभियांत्रिकी शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकसेवा आयोग (२०२१) परीक्षेतून त्यांची उपशिक्षणाधिकारी वर्ग २ या पदावर निवड झाली. पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्यसह पुरंदर तालुक्यातील शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी वैभव डुबल यांचे स्वागत केले.