Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन हे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. उरुळी कांचनची लोकसंख्या मोठी प्रमाणत वाढत असून गुन्ह्याची संख्याहि वाढत आहे. त्यामुळे उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देऊन कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्याची निवड करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली. Uruli Kanchan News
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश भेगडे बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
उरुळी कांचन येथील काही नागरिकांची उरुळी कांचन पोलीस ठाणे हे ग्रामीण पोलीस ठाण्यात राहावे. मात्र गुन्हेगारीचे प्रमाण पाहता हे पोलीस ठाणे शहरात राहावे यासाठी भारतीय जनता पार्टी उरुळी कांचनच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. यावेळी गणेश भेगडे यांनी वरील विधान केले आहे. Uruli Kanchan News
लोणी काळभोर व लोणीकंद या ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस ठाण्याच्या समावेश पुणे शहर पोलिस आयुक्तालयात १६ मार्च २०२१ ला करण्यात आला होता. राज्य शासनाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. Uruli Kanchan News
उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. दरम्यान, या पोलीस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार असून यामध्ये १ पोलीस निरिक्षक, ४ सहायक पोलिस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, २० पोलीस हवालदार, २५ पोलीस नाईक, तर ३० पोलीस शिपाई पदे भरली जाणार आहेत.
दरम्यान, उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्र आजूनही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरु असून पुणे आयुक्तालयास जोडले आहे. हेच पोलीस ठाणे स्वतंत्र पोलीस ठाणे करा अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करणार असल्याचे गणेश भेगडे यांनी नमूद केले.
शहर करा किंवा ग्रामीण करा पण लवकर करा..
उरुळी कांचन परिसरासाठी स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाणे मंजूर झाल्याने या ठिकाणी तत्काळ पोलिस ठाणे सुरू व्हावे म्हणून अनेकांनी पुणे ग्रामीण अधीक्षकांना निवेदने देऊ केली आहेत. मात्र मनुष्यबळाअभावी पोलिस ठाणे सुरू करता येणार नाही अथवा स्वातंत्र्यदिनी प्रजासत्ताकदिनी, महाराष्ट्रदिनी पोलिस ठाणे चालू होणार. अशी आश्वासने मिळत आहेत. नागरिकांनाही गुन्हेगारी, दहशतव वाहतूक कोंडीपलिकडे काही आश्वासक चित्र पाहायला मिळत नसल्याने शहर करा अथवा ग्रामीण करा पण पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरु करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. Uruli Kanchan News